Friday 19 June 2015

ग्रामीण जीवनातील समस्या

   *  ग्रामीण जीवनातील समस्या *

      एकविसाव्या शतकात आपल्या भारतापुढे ज्या अनेक समस्या आहेत,त्यापैकी एक समस्या म्हणजे आपल्या देशातील शहरे फुगली आहे आणि खेडी ओस पडली आहेत.असे का? या प्रश्नाचे उत्तर आजच्या ग्रामीण जीवनातील समस्यांत द्ड्लेले आहे.
          खेड्यात उअपासमार झाली की, कुटुंबेच्या कुटुंबे शहरांकडे धावू लागतात. मुंबईत रस्त्यांवर, घाणीत रहणारे या मंडळींना आपण जर का विचारले की, तुमचे गाव सोडुन तुम्ही या मुंबईत का येता? तर ते सांगातात,मुंबई कशीही असली ,तरी ती पोटाला दॊन घास देते.कष्ट  करणाऱ्याला येथे काम मिळते आणि कसे का
होईना, आम्ही जगु शकतो.”त्यामुळे खेड्यांतील मोकळे वातावरण सोडुन ते या प्रदु्षित शहरांकडे धावतात.
           आपला देश स्वतंत्र होऊन साठ वर्ष झाली आहे. तरी भारतातील खेड्यांतुन काही सुधारणा झाली नाही. उलट दिवसेंदिवस खेड्यांची स्थिती दयनिय झाली. आपण आजही अभिमानाने सांगतो की, “भारत माझा खेड्याचा देश आहे.” पण या खेड्यासाठी आपण
काय केले?- काहीही नाही.
             भारताच्या राष्ट्पित्याने स्वातंत्र पुर्व काळात आपल्याला हि जाणीव करुन दिली होती बापुजिंनी तरुणांना आदेश दिला होता “खेड्यांकडे चला” योजना आखल्या गेल्या ,तरी पण आजही कित्येक खेड्यांत रस्ते नाही खेड्या पाड्यातील सारी शेती तर पावसाच्या पाण्यावर अवलंबुन असते. लहरी पाउस कधी जास्त पड्तो ,कधी कमी पड्तो ,तर कधी अवेळी पड्तो कृषी क्षेत्रात अनेक नवीन शोध लागले आहेत ,नवीन अवजारे आली आहे पण ती खेडो पाडी पोहचत नाही .
         गांधीजी सांगतात ,आपल्या देशात मोठ-मोठे कारखाने आवश्यक नाही त्या ऎवजी खेड्यातील घराघरातुन उद्योगधंदे सुरु करा .एक गोष्ट खरी की ,खेडी सुधारली ,विकसीत झाली तरच देशाचा विकास होईल.


No comments:

Post a Comment